जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद येथे कायदेविषयक शिबिर संपन्न

1 min read

आळेफाटा दि.३०:- अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, जुन्नर व तालुका विधी सेवा समिती, तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर यांच्या सयुंक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद (ता.जुन्नर) या शाळेत करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागचा मूळ हेतू मुलांमध्ये कायद्याबाबत जागृती करणे व भारतीय राज्य घटनेने मुलांना दिलेला शिक्षणा बाबतचे हक्क तसेच पर्यावरण जागृती व दैनदिन जीवन जगत असताना प्रत्येकाने पर्यावरणाचा अभ्यास करत पर्यावरण समतोल राखण्यासाठी अधिकचे वृक्षारोपण होऊन वातावरणातील समतोल राखण्याबाबत आजच्या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नम्रता म. बिरादार, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय क.स्तर या होत्या. माननीयांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुलांना आपला विकास झाला आहे पण अद्याप सर्वांगीण विकास झाला नाही. मुलांच्या शिक्षणावर विशेष गुंतवणुक करण्याची मोठी गरज आहे.

बालकांशी निगडीत असलेल्या सर्व घटकांनी एकमेकाशी समन्वय साधत कार्यपद्धती अवलंबली पाहिजे, जेणेकरून कायद्याचा हेतू सफल होईल. तसेच पर्यावरण व त्याचे संवर्धन हि काळाची गरज असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याची जोपासना हा एकमेव पर्याय आपल्यासमोर असल्याचे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष्या नम्रता महादेव बिरादार यांनी या वेळी केले.

प्रमुख उपस्थिती मध्ये अनंत बाजड, सह.दिवाणी न्यायाधीश क.स्तर व स्वप्ना घुले, २ रे दिवाणी न्यायाधीश क.स्तर, जुन्नर हे न्यायाधीश उपस्थित होते. न्यायाधीश घुले यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलांना शासनाकडून मोफत शिक्षण व सक्तीचे शिक्षणाचा हक्क याबाबत मार्गदर्शन करताना कोणातही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही

तसेच पैसे नाहीत म्हणून शिक्षण घेणार नाही, असे न होण्यासाठी शासनाने व राज्य घटनेने केलेल्या तरतुदीबाबत सविस्तर अशी माहिती दिली. आपली शिक्षण व्यवस्था शिक्षणाला गुंतवणुक म्हणून पाहत नाही. त्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम हि बाब टाळण्यासाठी शासनाने जबाबदारी घेऊन शिक्षणाबाबत मुलभूत अधिकार दिलेले आहेत,

त्याबाबत यावर विशेष भर देत शासन स्तरावर असणाऱ्या विविध योजनांचा आधार घेत शिक्षण कसे पूर्ण करावे. याबाबत मार्गदर्शन केले. तर न्यायाधीश अनंत हि. बाजड यांनी मुलांना वाचनासाठी महापुरुषांचा चरित्रांचा पुस्तकांचा संच देणार असल्याचे सांगितले. यामुळे असणाऱ्या ग्रंथालयात नवीन पुस्तकांची भर पडणार आहे.

अँड रसूल इनामदार यांनी आपल्या भाषणात पर्यावरण विषयक जनजागृती करताना मुलांना काही चारोळ्या ऐकवत मुलांना प्रसन्न वातावरणात घेऊन गेले.  सदरचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद या ठिकाणी घेण्यात आला असून या कार्यक्रमात जिल्हा परिषदेची मुले, शिक्षक, पालक तसेच श्रीमती रेउबाई बाळाजी विद्यालय, वडगाव आनंद या शाळेची मुले, मुख्याध्यापक,

सर्व शिक्षक, पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता शिंदे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती जुन्नर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती सुनीता वामन यांनी तर आभार अँड. वैशाली देवकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी कोर्टाचे वतीने श्री.संतोष कापडाने व त्यांच्या स्टाफने तसेच शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याधापक, सर्व शिक्षक (दोन्ही शाळा) यांनी विशेष प्रयत्न केले

तर या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती लाभली त्यात अँड रवींद्र देवकर, अँड सुधीर कोकाटे, अँड केतनकुमार पडवळ, अँड सिद्धेश वाघोले, अँड गीतांजली कुऱ्हाडे, शितल पटाडे, अँड हीना जमादार, ग्रामपंचायत सदस्य संतोष पादिर हे देखील उपस्थित होते. तसेच शाळेचे शिक्षणतज्ञ सदस्य डी.बी.वाळूंज, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार तसेच सदस्य सतिश भिंगारदिवे,

सदस्य जया देवकर, रेश्मा कुटे तसेच मुख्याधाय्पक सुनील ठिकेकर, वृषाली कालेकर, मनीषा इले, संगीता कुदळे तर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रजनी डुंबरे, सहशिक्षक सुनील जावळे,पांडुरंग कासार, किरण लायगुडे, नारायण पडवळ, अमोल जावळे, सहशिक्षिका सविता आहेर, सुरेखा काकडे तर जिल्हा परिषद पालक दत्तात्रय चौगुले, पोलीस पाटील आदी पालक मोठ्या संखेत उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे