बेल्हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजीटल हॉल चे उद्घाटन
1 min read
बेल्हे दि.१:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेत आज डिजीटल हॉलचे उद्घाटन सन्मानीय देणगीदार अशोक काशिनाथ बेल्हेकर व रेखा अशोक बेल्हेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कै.शेवंताबाई काशीनाथ बेल्हेकर यांच्या समरणार्थ 1 लाख 32 हजार रुपये देणगी या कुटुंबाने शाळेला डिजिटल हॉल सुशोभिकरणासाठी दिली होती.
या हॉल मुळे नक्कीच शाळेच्या वैभवात भर पडली. शाळेला दिलेल्या भरीव देणगीबद्दल त्यांचा सन्मान सरपंच मनीषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट,मुख्याध्यापक मिरा बेलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शाळेला दिलेल्या देणगी बद्दल पंचायत समिती जुन्नरच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी देणगीदारांचे आभार मानले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ विलास पिंगट यांनी देणगीदारांचे आभार मानत शाळेत सुरु असलेला मिशन बर्थडे, स्पोकन इंग्रजी इ. उपक्रमांची माहिती दिली. अशोक बेल्हेकर व रेखा बेल्हेकर यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेचे कौतुक करत आगामी काळात शाळेला असेच सहकार्य करत राहणार असे सांगितले.
या प्रसंगी मुक्ताई देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष जानकु डावखर, धनंजय बेल्हेकर, शशिकांत बेल्हेकर, गणेश चोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोहेल बेपारी, सदस्य दादाभाऊ मुलमुले , शितल गुंजाळ, मनीषा बांगर, इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या उपशिक्षिका कविता सहाणे, सुवर्णा गाढवे, योगिता जाधव सुषमा गाडेकर, अंजना चौरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष डुकरे यांनी केले तर आभार हरिदास घोडे यांनी मानले.