सेवानिवृत्त उपप्राचार्य बळीराम लाटे यांच रविवार दुःखद निधन
1 min readआळे दि.२:- आळे ता. जुन्नर, जि. पुणे येथील ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे वाणिज्य विभागातील अकाउंटन्सी या विषयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य बळीराम दुधाराम लाटे (वय वर्ष 70) यांचे रविवार दि.३० बीड येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सेवानिवृत्त प्राचार्या मंगल लाटे, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील मुलगा डॉ. संग्राम लाटे तर पुणे येथील मुलगी प्रीती आंधळे असा परिवार आहे. सरांचे आळे परिसरात अनेक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात माजी विद्यार्थी आहेत. ते आदर्श व विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांच्या निधनाने आळे व परिसरावर शोककळा पसरली आहे.