राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; राज्यभरातून १६४० विद्यार्थ्यांचा सहभाग
1 min read
बेल्हे दि.२५:- बारावी पामा ग्लोबल अबॅकस अँड मेंटल अरेथमॅटिक असोसिएशन आयोजित बारावी पामा इंडिया नॅशनल कॉम्पिटिशन नुकतीच पुणे येथील नॅशनल स्पोर्ट पार्क बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल च्या २२ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत दैदीप्यमान कामागिरी केल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पारस सागर मोरे व ईश्वरी गोरक्षनाथ गवारी या विद्यार्थ्यांनी मिळविला.
तर दुसऱ्या क्रमांकामध्ये श्रीशैल आहेर, तेजस्विनी आहेर,स्वरा गुंजाळ,अनन्या पोटे,स्वराज कडूसकर, क्रिशंग गुंजाळ,तनिष आग्रे ,समर्थ आहेर, रुद्रा आहेर ,विघ्नेश आग्रे ,रेवा हांडे,आयुष्या डोंगरे व आलिना चौगुले यांनी पटकविला.तर तिसऱ्या क्रमांकामध्ये रुद्राक्षि शिंदे ,रुद्र नायकोडी ,शिवम बोरचटे,विराज बांगर,श्रद्धा आग्रे,अंशिका घाडगे या विद्यार्थ्यांना मिळाला.हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून प्रथमच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे.
अबॅकस हे जलद व अचूक गणिते सोडवण्याचे शास्त्र आहे.जगातील अनेक देशांमध्ये याचा वापर केला जातो. अबॅकस मुळे मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण होते. एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.आकलन शक्ती व बौद्धिक क्षमतेत वाढ होते.मुलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना जलद वाचन व लेखन करण्यास मदत होते.
सदर विद्यार्थ्यांना सारिका काळे व वेदिका गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत.
ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.