सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
1 min read
राजुरी दि.२४:- सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी (ता. जुन्नर) येथे जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक योगासने केली यात ताडासन, वृक्षासन, वज्रासन, भुजंगासन उत्तनपादासन, मण्डुकासन, पादहस्तासान, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, वक्रासन, शवासन आदी आसने साकारली. यात पूर्व प्राथमिक विभागापासून इयत्ता ९ पर्यंतचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक नवले सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नियमित योगा केल्यास शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारून अभ्यासात एकाग्रता वाढते.
असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना केले तर शाळेच्या उपमुख्याध्यापिका रिजवाना शेख यांनी दैनंदिन जीवनातील योगासनांचे महत्त्व स्पष्ट केले.
शाळेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय भालेराव यांनी या कार्यक्रमा संदर्भात मार्गदर्शन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमा चौगुले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सुरेखा बांगर यांनी मानले.