जिल्हा परिषद शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
1 min read
बेल्हे दि.२३:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर -१ शाळेला पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे च्या अधिव्याख्याता राजश्री तिटकारे यांनी भेट दिली. भेटीदरम्यान या शाळेच्या माजी विद्यार्थी असल्याने शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील गरीब व होतकरू ३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाने वर्गभेटी करत विद्यार्थांचे कौतुक केले. शाळेतील सर्व शिक्षकांना बदलत्या अध्यापन शैलीबाबत मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व विद्यार्थांना गोष्टींमधून मार्गदर्शन करत विदयार्थांची मने जिंकली.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बांगर, उपाध्यक्ष सोहेल बेपारी, सदस्य दादाभाऊ मुलमुले, शाळेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय देशपांडे,पालक सागर पिंगट, ग्रामस्थ संतोष साळुंके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मागील शैक्षणिक वर्षात शाळेने मिशन बर्थडे उपक्रमाच्या माध्यमातून मिळविलेला लोकसभा, मंथन , ऑलंपियाड इ .स्पर्धा परीक्षामध्ये मिळवलेले यश, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये मिळवलेली यश, लोकसहभागातून केलेले कार्यालय.
डिजिटल हॉल , सोलर सिस्टीम, स्पोकन इंग्रजी याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद व व्यवस्थापन समितीचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी त्यांचा सन्मान केला. उपशिक्षक संतोष डुकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
शाळेतील उपशिक्षक हरिदास घोडे, कविता सहाणे, सुवर्णा गाढवे, प्रविणा नाईकवाडी, योगिता जाधव सुषमा गाडेकर, अंजना चौरे यांनी संपूर्ण नियोजन केले. शिक्षणतज्ञ विलास पिंगट यांनी सर्वांचे आभार मानले.