मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थांवर विद्यारंभ संस्कार
1 min read
बेल्हे दि.२५:- जेव्हा लहान मुलाचे वय शिक्षण घेण्यायोग्य होते तेव्हा त्यांचा विद्यारंभ संस्कार करण्याची परंपरा आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) मध्ये पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विद्येची देवता सरस्वती याचे प्रार्थना व पूजन करून अभ्यासाला सुरुवात केली.
या समारंभाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा उत्साह निर्माण केला गेला. पालक आणि शिक्षक यांना देखील त्यांच्या या पवित्र आणि महान दायित्वाच्या बाबतीत जागरूक केले गेले.
विद्यार्थ्यांना अक्षर ज्ञान, संख्याज्ञान, विविध विषयांचे ज्ञान यांच्या सोबतच जीवनाच्या श्रेष्ठ मूल्यांचा देखील बोध आणि अभ्यास शाळेत करून घेतला जातो व याचीच सुरुवात विद्यारंभ संस्काराने होते. मानवी आयुष्यातील १६ संस्कारांपैकी विद्यारंभ संस्कार हा एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो.