विद्यानिकेतनच्या हेडगर्ल पदी श्रुतिका गाडगे तर हेडबॉय पदी ईश्वर जाधव ची निवड
1 min read
साकोरी दि.२६:- साकोरी (ता.जुन्नर) येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी स्कूल या ठिकाणी मुलांच्या मतदानातून हेडबॉय आणि हेडगर्ल यांची निवड करण्यात आली. यावेळी इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदान केले. निवडणूक प्रक्रिया कशी असते? त्याचा उपयोग काय होतो? मत दानाचा हक्क कधी बजवावा ? हे विद्यार्थ्यांना व्यवस्थित प्रात्यक्षिक स्वरूपात समजावे अशी धारणा या निवडणूक प्रक्रियेमध्ये राबवण्यात होती. यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या निवडणुकीचा आनंद घेतला.
व आपल्या ग्रामपंचायत लोकशाही निवडणूक प्रमाणे या निवडणुकीत गोपनीयता ठेवण्यात आली होती . इच्छुक उमेदवाराकडून अर्ध भरून घेणे, उमेदवारी माघारी घेणे, प्रचार करून विद्यार्थी प्रतिनिधी किती योग्य आहे हे पटवून देणे, चिन्ह वाटप करणे आदि प्रक्रिया राबविण्यात आल्या.
मतदानासाठी मतपत्रिका ही तयार करण्यात आली. मतपेटी शाही मतदान यादी शिवाय मतदान केंद्रावर केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदार प्रतिनिधी आदींची जबाबदारी ही विद्यार्थ्यांनी पार पाडली होती. मतमोजणी नंतर हेड गर्ल व हेडबॉय ची घोषणा करण्यात आली.
श्रुतिका गाडगे हिची हेडगर्ल पदी तर ईश्वर जाधव याची हेडबॉय पदी निवड झाली. या वेळी संस्थेचे संस्थापक पी.एम साळवे विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव ), पी एम हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य रमेश शेवाळे हे उपस्थित होते.
हे मतदान नियोजनबद्ध पार पाडावे यासाठी शाळेचे हेड ऑफ द डिपार्टमेंट कर्डीले गणेश, कलाशिक्षक विनोद उघडे, क्रीडाशिक्षक गणेश शिंदे, विश्वासराव प्रतिभा, पाचपुते रुपेश, दुपारे लीनता, वाघ श्रद्धा यांनी विशेष मेहनत घेतली तसेच नवनिर्वाचित हेड बॉय आणि हेडगर्ल चे अभिनंदन केले.