शुभम तारांगण जपतय योग दिनाची परंपरा; ११०० कर्मचाऱ्यांनी केला योगा
1 min readआळेफाटा दि.२२:- शुभम ईपीसी ग्रुप दर वर्षी त्यांच्या प्रत्येक साईट व कार्यालयात २१ जून योग दिवस आवर्जून साजरा केला जातो. योग दिनी कर्मचारी देखील उत्स्फुर्तेने या उपक्रमात सहभागी होतात. शुभम ईपीसी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड ही १९९७ पासून भविष्याची उभारणी करण्याच्या वचनबद्धतेने चालणारी प्रमुख ईपीसी कंपनी आहे. आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत व त्यांना साथ देत शुभम ईपीसी नेहेमीच विविध प्रकल्पांचं आयोजन करत असते.योगची साधना समाधानदायी आहे असे शुभम ईपीसी ग्रुपचे म्हणणे आहे. आपल्या विचारांना न्याय देत शुभम ईपीसी ग्रुपने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपल्या ११०० कर्मचाऱ्यांच्या संख्येने योग दिन साजरा केला.
शुभम ईपीसी ग्रुपने आपल्या शुभम तारांगण या नामांकित गृहप्रकल्पात देखील योग दिनचे आयोजन केले. ए.बी.वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा झाला. वाकचौरे यांनी विविध योगासनं शिकवली, यांमध्ये सूर्यनमस्कार, सूक्ष्म योगा, ताडासन, पर्वतासन, पंचकोशा मेडिटेशन, व इतर योगसनांचा समावेश होता. शुभम तारांगण प्रकल्पत येथील राहिवाशीयांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रकल्पातील विविध पदाधिकारी व महिलांनी योगासनां द्वारे शारीरिक व मानसिक दृष्ट्या समाधानी लाभ घेतला.शुभम तारांगण गृह प्रकल्पात विविध कला, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम होतात. योग दिनाचे औचित्य साधून साजरा केलेला हा कार्यक्रम आकर्षक होता. प्रकल्पातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेत व त्यांना आरोग्याचे महत्व समजावत या दिवसाची सांगता झाली.