वळसे पाटील महाविद्यालयात योग दिन साजरा
1 min read
निमगाव सावा दि.२१:-दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा.विजय काळे यांनी विद्यार्थ्यांना योगदिना विषयी माहिती सांगून योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली.
त्यांच्याबरोबर दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला. वृक्षासन,ताडासन, वक्रासन, अर्धचंद्रासन, चक्रासन, पद्मासन, कपालभाती यासारखे योगासनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
निरोगी, सर्वांग सुंदर जीवन जगायचे असेल आणि आपले व्यक्तिमत्त्व खुलवायचे असेल तर प्रत्येकाने नेहमी योगासने केली पाहिजेत. आपण सर्वांनी नेहमी योगासने करावीत असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी उपस्थितांना केले. तसेच विद्यार्थ्यांना यापुढे योगा चे धडे देऊन विविध स्पर्धा आयोजित करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला.
प्रा.अनिल पडवळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि प्राणायाम व श्लोक घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.