शुभम तारांगण गृहप्रकल्पात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

1 min read

आळेफाटा दि.२२:- योग दिनाच्या निमित्ताने आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक पाऊल पुढे. आरोग्यासाठी करण्यात येणारी गुंतवणूक ही सर्वात मोठी असते, म्हणूनच शुभम तारांगण गृह प्रकल्पात योग दिन साजरा करून.

प्रकल्पातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास हातभार. ए.बी.वाकचौरे ( आर्ट ऑफ लिव्हिंग योगा) यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा झाला. यावेळी प्रकल्पातील विविध पदाधिकारी व महिलांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गृह प्रकल्पात नेहमीच विविध कला, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, यावेळी देखील योग दिनाचे औचित्य साधून योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे विविध प्रकार घेऊन योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे