मॉडर्नच्या विद्यार्थ्यांना योगाचे धडे
1 min read
आणे दि.२१ (वार्ताहर):- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) येथील योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. केजी ते १२ वीच्या एकूण ९०० विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही शाळेच्या मैदानात एकत्र योगा केला. शिक्षकांनी यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे व उत्तम आरोग्याचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पि.सिंग शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्धर व्याधी योगासनामुळे नष्ट होण्यास मदत होते. योग हि एक साधना असून सातत्य पूर्ण सरावाने मनुष्याच्या जीवनात चांगल्या प्रकारचे अमुलाग्र बदल होऊ शकतात. योगामुळे स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच प्राणायाम केल्यामुळे श्वसनाचे विकार बरे होण्यास मदत होते. गुडगे दुखी,पाठ दुखी,कंबर दुखी या पासून आराम मिळतो. त्यामुळे योग व सूर्यनमस्कार आरोग्यासाठी हितकारक आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी रोज नियमित योग करावा.
असे प्राचार्या विद्या गाडगे यांनी या वेळी संगितले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे तसेच सर्व संचालक मंडळांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.