विद्यानिकेतन संकुलनात विद्यार्थी शिक्षकांचा सामूहिक योगा

1 min read

साकोरी दि.२२:- विद्यानिकेतन संकुलन साकोरी मध्ये योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. ज्युनिअर केजी ते हायस्कूल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही योगाचे यावेळी धडे घेतले. शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सर्वांनी शाळेच्या मैदानात एकत्र येऊन योगासने केली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्यासाठी व्यायाम योगा केला पाहिजे. शरीर ही आपली संपत्ती आहे ती जपली पाहिजे, त्यासाठी जीवनामध्ये व्यायाम हा हवाच याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शाळेचे संस्थापक पी.एम. साळवे विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रूपाली पवार (भालेराव). पी. एम.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. योग ही एक साधना असून सातत्यपूर्ण सरावाने मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र बदल होऊ शकतो. योगामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते. मानवाचे आजारपण पळून जाते. वयोमानानुसार माणसाला होणारे आजार पाठ दुखी, कंबर दुखी, गुडघेदुखी, थकवा येणे सर्वच आजारापासून आराम मिळतो. त्यामुळे व्यायाम, योगा आरोग्यासाठी हितकारक असल्याने नियमितपणे करावा. या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून नीता खिल्लारी यांनाही आमंत्रित केले होते. यांनीही म्युझिकल डान्स द्वारे व्यायामाचा सराव करून घेतला. संकुलनाचे अध्यक्ष पी. एम. साळवे यांनी योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे