जुन्नर तालुक्यातील बालकलाकार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर; आज होणार ‘नाळ -२’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर शो

1 min read

जुन्नर दि.१६:- ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या व सुधाकर रेड्डी एनक्वेट्टी डीओपी असलेल्या “नाळ – २” या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर शो रविवार दिनांक १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता झी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

झी स्टुडिओ व आटपाट प्रॉडक्शन निर्मित “नाळ – २’ या चित्रपटात शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व जुन्नर येथील बालकलाकार अगस्त्य किरण वाजगे तसेच आयुष अर्जुन वाव्हळ, वेद गणेश वाजगे, रायन चोको,

मिथिलेश मंगेश साळोखे, संस्कार योगेश औटी, उद्धव मंगेश रोकडे या नारायणगावातील बालकालाकारांनी व जुन्नर येथील राज गणेश शेटे, ओम राजू पारवानी, विराज गणेश शेटे यांनी भुमिका साकारल्या आहेत.

२०२२ मध्ये दसरा व दिवाळीच्या दरम्यान या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर, पिंपळगाव जोगा धरण परिसर, नानेघाट व गणेशखिंड येथे पार पडले. या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकारांचे कास्टिंग पत्रकार किरण वाजगे व आकाश डावखरे यांनी केले.

याशिवाय या चित्रपटात आपल्या तालुक्यातील किरण बुट्टे पाटील, दिलीप थोरात व किरण वाजगे आम्हीही छोटी भूमिका साकारली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे