बेल्हे येथील वाहतूक नियंत्रण कक्ष बंद; परिवहन मंडळ सुस्त मात्र प्रवाशी त्रस्त

1 min read

बेल्हे दि.१३ (वार्ताहर):- बेल्हे (ता.जुन्नर) येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे वाहतूक नियंत्रण कक्ष अद्याप बंद आहेत.लवकरच शाळा व कॉलेज सुर होणार असून विद्यार्थांना पास काढण्यासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नियंत्रण कक्ष सुरू होण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांकडून होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बेल्हे बसस्थांनकातील वाहतूक नियंत्रण कक्ष बंद असल्याने कार्यालय धूळखात पडले आहे. येथून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करत असतात. येथील प्रवाशांना एसटी बसची वेळ विचारण्यासाठी शेजारील दुकानदारांना विचारावे लागते.

तसेच बेल्हे, बांगरवाडी, आनंदवाडी, निमगाव सावा, आणे, नळवणे, पेमदरा, गुंजाळवाडी, गुळंचवाडी, तांबेवाडी, राजुरी, साकोरी, मंगरूळ, पारगाव या गावांतील शालेय विद्यार्थी येथे पास काढण्यासाठी येत असतात.

सद्या हे नियंत्रक कक्ष बंद असल्याने नारायणगाव किंवा आळेफाटा या ठिकाणी विद्यार्थांना जावे लागते. बेल्हे वाहतूक नियंत्रक त्यामुळे येथील कार्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.परिवहन मंडळ सुस्त तर प्रवाशी त्रस्त असे म्हणण्याची वेळ आली आहे.

एसटी चे वाहतूक नियंत्रक कक्ष बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण होत आहे. त्यांना गाड्या आल्या गेल्याची माहिती मिळत नाही तसेच रोज जाऊन येऊन करणारे प्रवाशी मासिक, तिमाही पास मिळण्यास अडचण येत आहे. तरी एसटी ने बेल्हे येथील वाहतूक नियंत्रण कक्ष लवकरात लवकर सुरु करावे.”

शिवाजी डुंबरे, बेल्हे, ग्रामस्थ

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे