बिबट्याच्या हल्यात कांदळीत सात शेळ्या ठार
1 min read
कांदळी दि.११:- जुन्नर तालुक्यातील कांदळी गावातील सुतारठेके येथील रामदास गुंजाळ या शेतकऱ्याच्या शेळ्यांच्या गोठ्यावरती बिबट्याने हल्ला करून चार शेळी व तीन बोकड फस्त केले. सोमवार दिनांक १० रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दबा धरून बसलेल्या बिबट्याने या गोठ्याला असणाऱ्या जाळी व पत्र्याच्या मध्ये असणाऱ्या जागेमधून आत प्रवेश केला.या हल्यात सात शेळ्यांचा मृत्यू झाला. संबंधित माहिती वनविभागाला कळताच वन विभागाने तात्काळ या घटनेचा पंचनामा केला. जुन्नर तालुक्यातील वाढते हल्ले त्यामुळे नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली राहत आहेत.