जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागवाडीत नवागतांचे स्वागत; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
1 min readबागवाडी दि.१५:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागवाडी या ठिकाणी सन 2024- 25 या वर्षाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून करण्यात आले.दाखल पात्र विद्यार्थ्यांची शंभर टक्के दाखलात करून विद्यार्थ्यांचे औक्षण करून प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प फुगा पाठ्यपुस्तक वही व पेन देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतील व अंगणवाडीतील सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून नवीन सत्राची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थांनी व पालक वर्गाने शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक साहित्य उपलब्ध केले. प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्राच्या केंद्रप्रमुख सर्वश्री काळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भिवसेन गाडगे, शिक्षणप्रेमी सदस्य गणेश गाडगे, चेअरमन प्रकाश गाडगे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गाडगे. सामाजिक कार्यकर्ते सोपान गाडगे, जागरूक पालक गोकुळ गोरडे, महेश विश्वासराव, माधुरी काटे, वर्षा वर्पे व सुधाकर कालेकर, सुशीला मते, अंगणवाडी कर्मचारी अनिता गाडगे व तारा गाडगे यांचे उपस्थितीत साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे कामी दिपक भिवसेन गाडगे, गणेश आबाजी गाडगे, प्रकाश गाडगे, भिवसेन विष्णू गाडगे, बाबाजी गाडगे, शशिकांत मते, जनार्दन मते, किसन नाना गाडगे. कैलास जाधव, सुधाकर कालेकर, बाबाजी बोऱ्हाडे, यांनी मदत केली.याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सुनिता औटी यांनी प्रास्ताविक केले व मुख्याध्यापक तान्हाजी जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.