गुरूवर्य ए.गो.देव प्रशालेत नवागताचे स्वागत
1 min read
बोरी खुर्द दि.१५:- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची सुरुवात आज दि.१५ जून २०२४ रोजी झाले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत,मोफत पाठयपुस्तके वाटप करावे असे शासनाचे आदेश होते.त्यानुसार बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील गुरुवर्य ए.गो.देव प्रशालेमध्ये आज इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत करण्यात आले. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक एस.सी. पटेल यांनी दिली. इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत पाठयपुस्तके वितरित करण्यात आली. तसेच शैक्षणक साहित्य वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.याप्रंगी बोरी खुर्द गावच्या सरपंच कल्पना काळे, उपसरपंच महेश काळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रामदास काळे, पोलीस पाटील अक्षय काळे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुदामदादा काळे.
सर्वोंनती मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण काळे पाटील, सचिव नरहरीदादा काळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ बांगर, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष शेटे, बाजीराव बांगर, सुभाष बांगर, मच्छिंद्र बांगर, सुभाष शिंदे,राजेश शिंदे, गौतम शिंदे, धोंडी भाऊ चिंचवडे, दत्तात्रय चिंचवडे.
देवराम चिंचवडे व सर्व शिक्षक -शिक्षकेतर वृंद आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन अमित शेटे यांनी, सुत्रसंचलन संजय धायबर यांनी, प्रास्ताविक एस.सी.पटेल यांनी, आभार विजय चव्हाण यांनी मानले.