श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत
1 min read
बेल्हे दि.१५:- रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठीचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पाठ्यपुस्तक संच वाटप करण्यात आले.प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक तथा प्राचार्य अजीत अभंग यांनी एस.एस.सी. व एच.एस.सी परीक्षेतील यशाचा आढावा घेण्याबरोबरच विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
शाळा समिती सदस्य ग्रामनेते रामभाऊ बोरचटे, धोंडीभाऊ पिंगट, विश्वनाथ डावखर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके यांनी समृद्ध शैक्षणिक जीवन या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भंडारी व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सावकार पिंगट यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र गाडगे, बेल्हे गावच्या लोकनियुक्त सरपंच मनिषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, ग्रामपंचायत सदस्य मंदा नायकोडी, कमल घोडे, किरण गुंजाळ, सुनिता चोरे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन विकास गोसावी यांनी केले.