श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत
1 min read
रानमळा दि.१५:- नवीन शैक्षणिक वर्ष २०२४- २५ ला शनिवार दि.१५ जून रोजी सुरुवात झाली असून श्रीमती. इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा, (ता- जुन्नर, जि- पुणे) येथे सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम जगताप व रानमळा गावच्या लोकनियुक्त सरपंच सविता तिकोणे यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.