ज्ञानमंदिर हायस्कूलमध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत
1 min read
आळे दि:-१५ आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आळे या विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.इ. ५ वी, ८ वी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयात गुलाबपुष्प व खाऊ देण्यात येऊन स्वागत करण्यात आले. यावेळेस इ. ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले. तसेच रोटरी क्लब सेंट्रल आळेफाटा यांच्या वतीने इ.५ वीच्या विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत आळेचे माजी उपसरपंच निलेश शिंदे, रोटरी क्लब सेंट्रल आळेफाटा चे अध्यक्ष विजय आहेर, हेमंत वाव्हळ, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुन्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, संचालक भाऊ कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, योगेश जाधव. किशोर कुन्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबुराव कुन्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, कैलास शेळके, दिनेश सहाणे, प्रदिप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुन्हाडे, रमेश कुन्हाडे, शामा जाधव, शांताराम कुन्हाडे, मुख्याध्यापक संदिप भवारी.
उपमुख्याध्यापक सुनिल कोते, पर्यवेक्षक गुलाब सुर्यवंशी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माऊली आडागळे यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक दिनेश सहाणे यांनी मानले.