धाबेवाडी शाळेत नवागतांचे स्वागत; पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप

1 min read

राजगुरुनगर दि.१५:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबेवाडी येथे नवागतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. इयत्ता पहिली नवीन प्रवेश विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व खाऊवाटप देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रविण पारवे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबेवाडीच्या विद्यार्थ्यांना खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे, नायफड केंद्राचे केंद्र प्रमुख भास्कर बुरसे यांच्याकडून नवागतांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे