आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते राजुरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन

1 min read

आळेफाटा दि.१४:- राजुरी (ता.जुन्नर) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यामध्ये राजुरी गावठाण अंतर्गत रस्ते, मुस्लिम मोहल्ला येथे पेविंग ब्लॉक टाकणे – १० लक्ष रु, राजुरी तुकाई माता मंदिर परिसर सुधारणा करणे – १० लक्ष रू, या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

तुकाई माता मंदिर परिसर सुधारणा अंतर्गत संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १० लक्ष रू, निधी मंजूर करण्यात आला होता परंतु काम पूर्ण होण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता होती. यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली असता तात्काळ आणखी १० लक्ष रुपये या कामासाठी मंजूर करून कॉन्ट्रॅक्टर तुषार औटी यांनी सलग भिंत पूर्ण करायला सांगितले.

यावेळी तुकाई माता देवीचे दर्शन घेतले आणि उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी मा. सभापती दिपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, एकनाथ शिंदे, एम.डी.घंगाळे, मोहन हाडवळे, जयसिंग औटी, बाळासाहेब औटी, अकबर पठाण, गौरव घंगाळे,

शाकीर चौगुले, संजुबाबा हाडवळे, मोहन नायकवडी, बाबाजी सरोदे, राजू औटी, नितीन औटी, मुबारक तांबोळी यांसह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे