रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल व श्रीरंगदास स्वामी देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने पायी दिंडी सोहळ्यासाठी फिरते शौचालय

1 min read

आणे दि.१३:- रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल व श्रीरंगदास स्वामी देवस्थान आणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची शौचालयाची अडचण होऊ नये म्हणून फिरते शौचालय देण्यात आले. आणे (ता.जुन्नर) येथे हे लोकार्पण करण्यात आले.

असल्याची माहिती रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष विजयकुमार आहेर यांनी दिली.या फिरत्या शौचालयात पाच पुरुष व पाच महिला शौचालय आहेत. या शौचालयाचे लोकार्पण गुरुवार दि.१३ रोजी रोटरी करण्यात आले.

या वेळी रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष विजयकुमार आहेर व रंगदास स्वामी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते व विश्वस्त, रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल चे संस्थापक महावीर पोखरण व खजिनदार विमलेश गांधी.

रोटरीयन हेमंत वावळ, अंकुश शिंदे, अक्षय शिंदे व ग्रामस्थांच्या उपस्थित होते. या वेळी आणे व परिसरातील वारकरी तसेच ग्रामस्थांनी रोटरी क्लब व देवस्थानचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे