पारनेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; हंगा नदीला पूर

1 min read

पारनेर दि.१३:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटी सदृश्य पावसाने ओढे नाले ओसंडून वाहू लागले. तर शेतकऱ्यांच्या शेतात मुसळधार पाऊस पडल्याने माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले.

जून महिन्यात शनिवारी (ता.८) व रविवारी (ता. ९) तारखेला पावसाचे आगमन झाले. सोमवारी एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. ११) पुन्हा सकाळी ढग दाटून आले होते.सुपा शहरात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले.

बाजारतळ व सुपा बसस्थानकात पाणी आल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. नगर – पुणे महामार्गावर चालकांना वाहने काढतांना मोठी कसरत करावी लागली. तर वाळवणे रस्त्यावर पूल झाल्यानंतर प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने वाहतुकीला अडथळा न होता.

नागरिकांना ये – जा करता आल्याने समाधान व्यक्त केले. तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हंगा नदीला गेली चार ते पाच वर्षांत प्रथमच मोठ्या प्रमाणात पाणी आले. तर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्याने रस्त्याची दुरवस्था झाली.

दरम्यान, चालू वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणीपूर्व मशागती शेतकऱ्यांनी पुर्ण केल्या. महागडे बी बियाणे खरेदी केली आहेत. वापसा होताच खरीप हंगामातील मूग, बाजरी, वाटाणा, तूर, जनावरांसाठी मका, कडवळ, घास आदींची पेरणी व सोगणी करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे