महेश मेमोरियल हॉस्पिटलच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त १६ जून ते २४ जून दरम्यान अल्प दरात उपचार
1 min read
आळेफाटा दि.१२ :- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील महेश मेमोरियल हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त महेश मेडिकल अँड सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने महिला भगिनींसाठी सिझर, गर्भाशय काढणे यांसारख्या शस्त्रक्रिया तसेच हर्निया, अपेंडिक्स, (पुरुष व महिला) दोघांसाठीही शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार आहेत.
यामध्ये सिझर २५ हजार ५०० (औषधासहित), गर्भाशय काढणे २२ हजार ५०० (औषधासहित), हर्निया शस्त्रक्रिया १८ हजार ५०० (औषधासहित), अपेंडिक्स शस्त्रक्रिया १९ हजार ५०० (औषधासहित) केल्या जाणार आहेत. त्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून 16 जून ते 24 जून या दरम्यान नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
तसेच ऑपरेशनच्या वेळी होणाऱ्या रक्त लघवी तपासणीमध्ये 40% सवलत देण्यात येणार असून शिवाय या कालावधीमध्ये नोंदणी करणाऱ्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टर कथे डाग्नोस्टिकच्या सौजन्याने 50% सवलत देण्यात येणार आहे. तसेच या कालावधीमध्ये डेंगू, टायफाईड, कावीळ, मलेरिया किंवा इतर आजारांनी ऍडमिट झालेल्या व्यक्तीला सुद्धा हॉस्पिटलच्या बिलात 50 टक्के सवलत देण्यात येईल.
त्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. मनीषा गाडेकर व डॉ. संजय गाडेकर यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी पत्ता:- महेश मेमोरियल हॉस्पिटल, शिंदे- बामणे मळा रोड, एसटी स्टँडच्या मागे, नगर रोड, आळेफाटा, ता. जुन्नर जि. पुणे. ओपीडी वेळ सकाळी 11 ते रात्री 8 संपर्क:- 9552304597, 9766408510