खेड गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी शिक्षकांना केले मार्गदर्शन
1 min readखेड दि.११:- नायफड केंद्राच्या शाळा पूर्व तयारी मिटींग च्या निमित्ताने खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांची भेट झाली. या भेटीच्या निमित्ताने शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी दि.१५ जून रोजी विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत पाठ्यपुस्तक वाटप, शंभर टक्के उपस्थिती. पहिली इयत्ता प्रवेश व प्रवेशोत्सव सोहळा इ.बाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रज्ञाशोध परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून या वर्षी गुणवत्तेबाबत योग्य तत्पर राहण्यासाठी मार्गदर्शन वर्ग, तसेच गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक प्रयत्न करण्यासाठी. योग्य त्या सूचना गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिल्या. यावेळी नायफड व टोकावडे केंद्राचे केंद्र प्रमुख व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.