मॉडर्नच्या हेडबॉय पदी सार्थक बांगर तर रिया हाडवळे हेडगर्ल; प्रत्यक्ष मतदानातून निवड
1 min read
बेल्हे दि.१२:- लोकशाही आपले अधिकार आणि कर्तव्य काय?निवडणुकीची प्रक्रिया कशी असते? या सार्या गोष्टीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) येथे खास निवडणूक प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते.
या निवडणुक प्रक्रियेतून शाळेचा हेडबॉय आणि हेडगर्ल पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांना संगणक, सायकल, स्कूल बॅग अशा प्रकारचे चिन्ह देण्यात आले होते. हेडगर्लसाठी व हेडबॉय साठी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात होते. सहावी ते बारावी च्या विद्यार्थांनी व शाळेच्या सर्व शिक्षकांनी मतदान केले.
लोकशाहीतील निवडणुकांप्रमाणे गुप्त मतदान घेण्यात आले. इच्छूक उमेदवारांकडून अर्ज भरून घेणे, उमेदवारी माघार घेणे, प्रचार करणे, चिन्ह वाटप आदी प्रक्रिया राबवण्यासाठी तब्बल सात दिवस निवडणूक राबवण्यात आली. मतदानासाठी मतपत्रिका ही तयार करण्यात आल्या.
मत पेटी, शाही, मतदार यादी, मतपत्रिका आधीचे नियोजन करण्यात आले होते. शिवाय मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदार प्रतिनिधी आदि ची जबाबदारीही विद्यार्थ्यांनीच पार पडली. मतमोजणीनंतर शाळेच्या हेडबॉय व हेडगर्ल ची घोषणा करण्यात आली. या निवडणुकीत सार्थक बांगर हेडबॉय तर हाडवळे रिया प्रवीण हि विजयी झाली.
यातून विद्यार्थ्यांना लोकशाहीची संकल्पना स्पष्ट झाली अशी माहिती शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांनी दिली. या निवडणूक प्रक्रियेतून नवी माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्य विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पि.सिंग शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावकार गुंजाळ,अध्यक्ष गोपीनाथ शिंदे तसेच सर्व संचालक मंडळांनी नवनियुक्त हेडबॉय व हेडगर्ल चे अभिनंदन केले.