समर्थ पॉलिटेक्निक मध्ये वर्किंग प्रोफेशनल साठी मान्यता
1 min read
बेल्हे दि.२:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (ता.जुन्नर) या तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये वर्किंग प्रोफेशनल साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
कारखाने किंवा विविध कंपनी मध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींसाठी व पुढील तंत्र शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने वर्किंग प्रोफेशनल अंतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजिनियरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आदी अभ्यासक्रमांमध्ये पुढील शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना वर्किंग प्रोफेशनल अंतर्गत डिप्लोमा शिक्षण घेण्यास समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे या महाविद्यालयास प्रथमच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांची मान्यता मिळाली आहे.
वर्किंग प्रोफेशनल मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. बारावी विज्ञान शाखेमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स या विषयांबरोबरच इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, एग्रीकल्चर इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज इ.विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
तसेच दहावीनंतर दोन वर्षाचा आयटीआय त्याचबरोबर एक वर्षाचा इंडस्ट्रीमधील अनुभव असलेले विद्यार्थी सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र आहेत अशी माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये हा अभ्यासक्रम सुरू झाल्याने जॉब करताना.
पुढील उच्च शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य अनिल कपिले-९९७०८९९८४७,प्रा.संजय कंधारे-९७६६३०३७०१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.