कल्याण- नगर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

1 min read

बेल्हे दि.२९:- कल्याण – नगर महामार्गावर दिवसेंदिवस अपघात वाढत चालले असून वाहन चालकांनी वेगावर नियत्रंण ठेवण्याची गरज आहे. बेल्हे परिसरात कार-मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्यावर मागून आलेल्या दुसऱ्या कारखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. २८ सायंकाळी कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर वाडेकरवस्ती येथे घडली. या अपघातात पांडुरंग नंदाराम भांबेरे (रा. बेल्हे) यांचा मृत्यू झाला आहे. बेल्हे गावच्या दिशेने पांडुरंग भांबेरे हे त्यांच्या मोटारसायकलीवरून (एमएच १२, बीव्ही ६९) जात होते. आळेफाट्याकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या कारची (एमएच १४, एफएक्स ३९९८) त्यांच्या दुचाकीस समोरासमोर धडक बसली. या धडकेने हवेत उडालेले भांबेरे हे मागून आलेल्या दुसऱ्या कारखाली (एमएच १६, डीबी ९०९९) खाली सापडून जागीच ठार झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे