साई संस्कार क्लासेसचा सलग १२ वर्ष दहावीचा १०० टक्के निकाल
1 min read
बेल्हे दि.२९:- येथील सर्वोत्तम गुणवत्ता असलेल्या साई संस्कार क्लासेसचा इयत्ता दहावीचा निकाल यावर्षी देखील 100% लागल्याची माहिती डायरेक्टर अमर डुकरे यांनी दिली.यामध्ये वैष्णवी गोरक्ष गलांडे ही विद्यार्थिनी गणित विषयात 100 पैकी 99 गुण व एकूण 93.40% गुण मिळवून क्लासमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तसेच वैष्णवी पांडुरंग गाडगे ही विद्यार्थिनी समाजशास्त्र या विषयात शंभर पैकी 97 गुण मिळवून एकूण 92.80% गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाली.
तर सेजल विठ्ठल गाडगे ही विद्यार्थिनी समाजशास्त्र या विषयात 95 गुण मिळवून एकूण 91.80% मिळवून तिसऱ्या क्रमांकांनी उत्तीर्ण झाली.यामध्ये रोहित औटी, विवेक खरात, अथर्व गुंजाळ, सिद्धेश शिंदे, अक्षदा पिंगट, अर्जुन खरात, साहिल गुंजाळ, गौरी गुंजाळ, ओंकार गुंजाळ.
सुजल मटाले, आदित्य बोरचटे, अपूर्वा वाघ, जयेश बोरचटे, अमोल गुंजाळ, आदित्य गाडगे, रिया भांबेरे, पियुष दरेकर आणि प्रांजली गुंजाळ, गौरी डोंगरे, उर्मिला पुरोहित, ओम गुंजाळ, गायत्री घोडे, आयुष बोरचटे, आयुष तारू, सिद्धेश बांगर, श्रावणी बिचारे, आदित्य बांगर.
ओम गायकवाड या सर्वांसह एकूण 21 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त तर एकूण 32 विद्यार्थ्यांनी 70% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचे साईसंस्कार संकुलाच्या वतीने डायरेक्टर अमर डुकरे, प्राचार्य अनुजा डुकरे, कॅम्पस डायरेक्टर सपना शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.