राजुरीत बिबट्याच्या हल्यात बोकडाचा फडशा
1 min read
राजुरी दि.२२:- राजुरीत बिबटयाच्या हल्ल्यात बोकड ठार झाला आहे. राजुरी (ता.जुन्नर) येथील उपळी मळ्यात रहात असलेल्या कल्पना सोनभाऊ औटी यांच्या शेळी पालनाचा व्यवसाय असुन मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना शेळयांचा ओरडण्याचा आवाज आला
असता बिबट्याने त्यांच्या एक वर्षीय बोकडावर हल्ला करुन बाहेर फरफटत नेत असल्याचे दिसले त्यांणी मोठ्याने आवाज केला असता बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला परंतु झालेल्या हल्ल्यात बोकड मुत्यूमुखी पडली आहे.घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी त्रिबंक जगताप, स्वप्निल हाडवळे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.