वडगाव आनंद येथे सोयाबीन बिज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

1 min read

बेल्हे दि.२२:- खरीप पूर्व नियोजन मध्ये सोयबिन चे वाढते क्षेत्र बघता बियाणांचा तुटवडा होऊ नये म्हणून घरगुती बियाणे वापरावे व त्यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी घ्यावी बियाणे पेरतात त्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी शेतामध्ये बियाणे पेरताना बीबीएफ यंत्राचा वापर करावा असे आवाहन मंडल कृषी अधिकारी राजश्री नरवडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत क्षेत्रिय स्तरावर दर वर्षी खरीप हंगाम सुरू होण्या पूर्वी खरिपातील मुख्य पीक व पिवळे सोने समजल्या जाणाऱ्या सोयाबीन या बियाण्याची उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया या मोहिमा राबविल्या जात असुन याही वर्षी महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पुर्व नियोजन मोहीम

वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील शिवाजी डोके यांच्या शेतावर आयोजीत करण्यात आले होते त्याप्रसंगी उपस्थित शेतक-यांणा मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी वैभव विश्वे, कृषी पर्यवेक्षक शिवकांत कोल्हे अनेक शेतकरी उपस्थित होते.

बेल्हे मंडल कार्यालयाअंतर्गत एकूण ३५ गावे असून यामध्ये अंदाजे ४८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असुन त्यासाठी २६४० क्विंटल बियाणे बियाणे ची गरज असुन सध्या शेतक-यांकडे ३२०० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. याप्रसंगी नरवडे यांनी उपस्थित शेतक-यांना माहिती देताना सांगीतले उत्पादित झालेल्या सोयाबीन बियाणे च पेरणी साठी उगवण क्षमता चाचणीसाठी सुरवातीला एक ओले बारदान घ्यावे त्यावर सोयाबीन चे १०० दाणे १० ओळीत

एक सारखे ठेवावे आणि त्या बारदानाची गुंडाळी करून सावलीत ठेवावे व बा रदानातील पाणी सुकले तर थोडे अर्धा ग्लास पाणी त्यावर ओतावे व नंतर तीन दिवसांनी गुंडाळी खोलून त्यातील किती बियाणे उगवले आहे ते तपासावे आणि त्यानुसार पेरणीसाठी किती बियाणे आवश्यक आहे ते समजते.

समजा उगणक्षमता क्षमता ८५ बियाणे उगवून आले तर ८५% बियाणे ची उगवण क्षमता आहे आणि मग एकरी आपण जात बी बी एफ यंत्र ने पेरणी केली तर २२ किलो बियाणे लागते त्यानुसार पेरणी करावी. तसेच पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करताना FIR पद्धतीनें करावी म्हणजे अगोदर बुरशी नाशक, नंतर कीटक नाशक आणि त्यानंतर जैविक अशी तीन टप्यात बीजप्रक्रिया केली तर बियाणे रोगमुक्त राहते व पीक जोमदार येते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे