श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल 94.24 टक्के
1 min read
निमगाव सावा दि.२२:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा (ता. जुन्नर) या महाविद्यालयाचा इयत्ता बारावी वाणिज्य व विज्ञान शाखेचा शैक्षणिक वर्ष 2023- 24 चा निकाल शेकडा 94.24% लागल्याची माहिती प्रा. शिवाजी साळवे यांनी दिली.
महाविद्यालयातून इयत्ता बारावी वाणिज्य शाखेत एकूण 40 आणि विज्ञान शाखेत 50 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.इ यत्ता 12 वी वाणिज्य 90%, प्रथम तीन क्रमांक…1)पठाण सिमरन महेबुब .62.67, 2) शेख सानिया याकूब.60.50, 3)भापकर ओंकार नामदेव.55,
इयत्ता 12 वी विज्ञान 100%, प्रथम तीन क्रमांक 1) औटी वेदांत अशोककुमार. 65, 2) मते ऋतुजा बंडेश= 60.67%, 3) गाहिने वैष्णवी संतोष=60%, 3)संभेराव आदित्य रामदास=60,
या सर्व यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्थेचे सचिव परेश घोडे, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.