विद्यानिकेतन पी.एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, साकोरीची १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम

1 min read

साकोरी दि.२२:- सन २०२३- २०२४ चे विद्यानिकेतन पी. एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, साकोरी (ता.जुन्नर) या महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क मिळवून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली

वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक गुंजाळ वैष्णवी जालिंदर ८५.८३% द्वितीय क्रमांक पिंगळे आरती प्रकाश ७९.६७%, तृतीय क्रमांक मोमीन निदा आतिफ ७०.८३ % तसेच विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक सोनवणे रोशनी रविंद्रकुमार ७९.६७ %, द्वितीय क्रमांक भोर वेदांत रामकृष्ण ७७.१७%, तृतीय क्रमांक बंने साक्षी मनोज ६७.१७% गुणवंत

विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या कामगिरीत भरीव असे योगदान दिले आहे. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.एम साळवे, प्राचार्या, सुनिता शेगर , विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव ) तसेच मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विद्यालयाच्यावतीने हार्दिक

अभिनंदन करण्यात आले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे