जुन्नर तालुक्याचा निकाल ९३.९७ टक्के, यंदा ही मुलींची बाजी
1 min read
xr:d:DAFj-lz48mw:2,j:5493838725,t:23052602
जुन्नर दि.२२:- यंदाही जुन्नर तालुक्यात बारावी परीक्षा उत्तीर्ण होण्यात मुलींची सरशी दिसून येत असून जुन्नर तालुक्याचा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.९७ टक्के लागला असून ४७२९ विद्यार्थ्यांपैकी ४४४४ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.
जुन्नर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल (टक्केवारी) : शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर (९२.०४), सद्गुरु ज्युनियर महाविद्यालय पिंपरी पेंढार (९६.४५), श्री बेल्हेश्वर सेकंडरी आणि गुंजाळ महाविद्यालय बेल्हे (१००), ज्ञान विद्यामंदिर आळे (९४.१५), एस. व्ही.महाविद्यालय पिंपळवंडी (९६.६६), हिंदमाता महाविद्यालय वडगाव कांदळी (८७.०९),
पंडित नेहरू महाविद्यालय निमगाव सावा (८२.१४), एस. फुले व एस. तांबे महाविद्यालय ओतूर (९३.६८), विद्या विकास मंदिर राजुरी (८९.४७), अंजुमन महाविद्यालय जुन्नर (९३.३३), श्री रंगदास स्वामी महाविद्यालय आणे (७९.३१), न्यू इंग्लिश स्कूल आपटाळे (६६.६६), आणे माळशेज महाविद्यालय जुन्नर (९७.२९), शासकीय महाविद्यालय (१००),
जे.आर. गुंजाळ महाविद्यालय आळेफाटा (१००), हांडे देशमुख महाविद्यालय आळेफाटा (१००), अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय तळेरान (८६.२७), अनुदानित आश्रम शाळा कोळवाडी (७९.४१), समर्थ कॉलेज बेल्हे बांगरवाडी (९९.५२), हिंद कनिष्ठ विद्यालय (८३.३३), विद्यानिकेतन साकोरी (१००),
श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा (९४.५४), शासकीय आश्रम शाळा (९३.०२), शासकीय आश्रम शाळा (९३.७५), ब्लूमिंग डेल कनिष्ठ महाविद्यालय (१००), ज्ञानराज कनिष्ठ महाविद्यालय आळे (१००), निवृत्ती शेठ शेरकर निवृत्तीनगर कनिष्ठ विद्यालय (९१.६६), समर्थ बेल्हे (९१.१७),
अण्णासाहेब वाघिरे (९६.८७), श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर (७६.४७), गुरुवर्य रा.प. सबनीस नारायणगाव (८४.४४), सुभाष विद्यामंदिर (७५).