बेल्हे येथील साई संस्कार क्लासची सलग १२ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम

1 min read

बेल्हे दि.२१:- इयत्ता बारावीच्या निकालामध्ये बेल्हे (ता.जुन्नर) येथील साईसंस्कार क्लासेस चा विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून तनिष्का विजय गाडगे हिने 75.67 % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. दीक्षा प्रवीण गायकवाड ही 73.17% गुणांसह द्वितीय तर प्रियंका नितीन वाघ ही 71.67 % गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली.

यासोबतच शुभम वाळुंज, जिज्ञासा चोरे, रिद्धी सावंत, गौरी गुंजाळ, साहिल शिंदे, अनुज सावंत, ओम डावखर या विद्यार्थ्यांनी देखील या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन वर्षभर होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचा क्लास वरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांना फक्त शिकवून पुढे न जाता सतत परीक्षा घेतल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरपूर वाढ झाल्याची दिसून येत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक होत असून क्लासच्या सर्व शिक्षकांचे देखील अभिनंदन करण्यात येत आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना जी.एस.गुंजाळ, व्ही.व्ही.देवकर, पी.एल.सहाणे, ए.के.सुपेकर, ए.ए. डुकरे, एस. एस. शिंदे. या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल क्लासचे संचालक अमर डुकरे व प्राचार्या अनुजा डुकरे, कॅम्पस डायरेक्टर सपना शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे