वैशाख पाैर्णिमेला हाेणार वन्य प्राण्यांची गणना

1 min read

पुणे दि.१९:- वन विभागातर्फे दरवर्षी वैशाख पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना केली जाते. या गणनेसाठी वनविभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील अभयारण्यासह वनविभागाच्या ठिकाणी ही प्राणी गणना केली जाणार आहे.

जिल्ह्यातील प्रमुख पाणवठ्याच्या ठिकाणी वन विभागातर्फे उंच ठिकाणी झाडांच्या बांध्यावर किंवा टेकडीवर झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने अडोसा निर्माण केला जातो. त्यामध्ये वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच काही पर्यावरण मित्र स्वयंसेवक म्हणून थांबतात. वैशाख पोर्णिमेला दिवसा आणि रात्री किती वन्य प्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आले. त्याची गणना केली जाते.

वन्य प्राण्यांच्या वेगवेगळ्या वर्गवारीतील किती प्राणी आले. त्यांची गणना केली जाते, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे