पुणे तिथे काय उणे ! लग्नासाठी तरुणाची हटके अपेक्षा

1 min read

पुणे दि.२१:- लग्नासाठी मुला आणि मुलीच्या एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. त्यातील सर्वात सामान्य अपेक्षा म्हणजे मुलाची चांगली किंवा सरकारी नोकरी असावी. पण मुलं मात्र मिळाली तरी खूप अशा भूमिकेत असतात. कारण मुलांना आता मुली मिळणं कठीण झालंय.

मुलींच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की त्या पूर्ण करता करता मुलांच्या नाकी नऊ येतात. दरम्यान पुणे तिथे काय उणे, पुण्यातल्या अशाच एका तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं त्यानं एक बायोडेटा बनवून त्याचं पोस्टर छापलं आहे. हे पोस्टर त्यानं चौका- चौकात लावलं आहे.

लग्नासाठी आपल्या पसंतीची मुलगी शोधण्यासाठी एका व्यक्तीने असा अनोखा मार्ग शोधला की सारेच हैराण झाले. सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पण एका पठ्ठ्याने वधू शोधण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे.या तरुणाच्या बायोडेटावर सर्वसामान्यपणे जशी माहिती असते तशी दिलेली आहे.

म्हणजेच, मुलाची माहिती. नाव – मनिष खामकर, गावं – वाटेगांव, शिक्षण – १२वी पास, शेती – १ एकर, नोकरी – पुण्याला कामाला. इथपर्यंत सगळं ठिक होतं मात्र या बायोडोटाच्या शेवटी या पुणेकर तरुणानं जे लिहलंय ते हाष्यास्पद आहे.

शेवटचा पर्याय म्हणत या तरुणानं त्याच्या बायोडोटाच्या शेवटी, “अपेक्षा – पोरगी कसली पण असुदे फक्त जीवंत पाहिजे.” अशी अपेक्षा लिहली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे