जुन्नर तालुक्यात अडीच हजार कर्मचारी व अधिकारी सज्ज; मतदारांना मोबाईल बंदी

1 min read

जुन्नर दि.१२:- सोमवार दि.१३ रोजी होणाऱ्या शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतंर्गत जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. जुन्नर तालुक्यातील १४६ गावात ३५६ मतदान केंद्र आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ९ हजार ३९१ मतदार असून.

यात स्त्री मतदार संख्या १ लाख ५० हजार ९७६, तर पुरुष मतदार संख्या १ लाख ५८ हजार ४१५ तसेच तृतीयपंथी मतदार संख्या तीन असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाडगे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र सबनीस यांनी सांगितले.

सोमवारी होणाऱ्या प्रक्रियेसाठी २ हजार मतदान ४०४ कर्मचाऱ्यांना दोन दिवस निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रिया, ईव्हीएम, व्हीव्ही पॅट हाताळणीबाबत तसेच ईव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिकासह हँड्स ऑन ट्रेनिंग देण्यात आले.

या प्रशिक्षणात ६३२ केंद्राध्यक्ष, १ हजार ७७२ इतर मतदान अधिकारी यांचा समावेश होता. डीवायएसपी रवींद्र चौधरी यांनी तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व नागरिकांना सुचित केले आहे की, लोकसभा निवडणुक 2024 ची मतदान प्रक्रिया दि.13/05/2024 रोजी सकाळी 07.00 ते सायं 6.00 वा. दरम्यान पार पडणार असुन.

सदर मतदान प्रक्रिये वेळी कोणत्याही मतदाराला मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नसून जर एखाद्या मतदाराकडे मतदान केंद्रामध्ये मोबाईल आढळून आला तर निवडणूक आयोग सदर व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे