मंचर शहरासह परिसरात वीज, वादळी वाऱ्यासह धुवांधार पाऊस
1 min readनिघोटवाडी दि.१०:- मंचर, निघोटवाडी परीसरात वीजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यांसह प्रचंड मोठया आकाराच्या थेंबांसह धुवांधार पाऊस कोसळत असुन व्यावसायिक, शेतकरी, प्रवासी यांना अचानक आलेल्या पावसाने झोडपुन काढले असुन, शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून, काढायला आलेली बाजरी पिके डोळ्यांसमोर भुईसपाट होत असल्याचे पाहून बळीराजाचा तोंडचा घास हिरावला जाताना दिसत आहे. आधीच भाजप घ्या शेतकरी हिताविरोधात केंद्र सरकारच्या निर्यात बंदी नं कांदा, सोयाबीन ला मातीमोल भाव मिळाला,त्यातच रासायनिक खतांच्या वाढवलेल्या किमतीनं आर्थिक गणित च कोलमडलं असुन आधीच सरकार ची सुलतान या त्यात या अवकाळी पावसाच्या आसमानी संकटाने शेतकरी व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असुन. स्वार्थासाठी राजकारणी एका रात्रीत पक्ष बदलुन स्वताचं, आपल्या लाभार्थींच्या हिताचं पहात असताना शेतकरी, व्यावसायिकांवर कोसळलेल्या संकटाकडे पहायला मात्र वेळ नाही,त्यात अधिकारी,प्रशासन निवडणुकीतच दंग असल्याने मदतीचा निर्णय होईल असं वाटत नाही. अशी शेतकरयांची भावना असुन ताबडतोब पंचनामा व त्वरीत मदत अशी मागणी होत आहे, राजकारणी प्रचारात मग्न तर अधिकारी त्यांच्या सरबराईत व्यस्त तर एखादया जेवणानं मत विकत घेणारे, त्यासाठीआपलं मत विकणारे असतील. तर परत पाच वर्षे हुकूमशाही, भ्रष्टांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदं बहाल करणारा, विरोधकांना मात्र ईडी सीबीआय चौकशी धाडी जेल लावणारा कारभार चालतच राहिल.सामान्य माणसांचं सुखदुःख प्रचंड कमाई करणारे कोणीच पहात नसल्याने अस्वस्थता वाढली आहे.