मतदान केंद्रात मोबाइलला नो-एन्ट्री
1 min read
पुणे दि.७:- मोबाइल हा प्रत्येकाच्याच जीवनात सवयीचा भाग बनला असला, तरी १३ मे रोजी सजग नागरिकांना मोबाइलपासून काही काळ दूर राहावे लाागणार आहे. मतदानाची प्रक्रिया सोमवार (दि. १३) राबवण्यात येणार असून मतदान केंद्रांवर मोबाइल नेण्यास मनाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोबाइल घरी ठेवूनच मतदानासाठी बाहेर पडावे लागणार आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक आयोगाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मतदान करतानाचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास देखील मनाई केली आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी, यासाठी मतदान केंद्र परिसरात कलम १४४ लागू असणार आहे. अधिकृत निवडणूक कर्मचारी व पोलिसांना सवलत देण्यात आली आहे.