मद्यविक्री दुकाने आठ दिवस बंद राहणार; जिल्हाधिकारी यांचे आदेश
1 min readपुणे दि.३:- जिल्ह्यात दि. ५ मे या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून पुढे दुकाने बंद राहणार आहेत. दि. ६ मे या दिवशी संपूर्ण दिवस आणि दि.७ मे या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तर ११ मे या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून आणि दि. १२ मे या दिवशी संपूर्ण दिवस, दि. १३ मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तर दि. ४ जूनला मतमोजणीच्या दिवशीही मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.जिल्ह्यात लोकसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी दि.७ मे तर पुणे, मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी दि.१३ मे या दिवशी मतदान होणार आहे. या चारही मतदारसंघाची मतमोजणी दि.४ जूनला होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिनाभरात आठ दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी
केले आहेत.