पुणे जिल्ह्यात तापमान वाढीचा प्रकोप; पारा @ ४३ अंशांपुढे; हंगामातील सर्वोच्च नोंद

1 min read

पुणे दि.३०:- एकेकाळी थंड म्हणवल्या जाणऱ्या पुणे परिसरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान नोंद सोमवारी झाली. यात शहर बहुतांश परिसरांमध्ये तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या आसपास राहिला. तर, जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे.पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमान ४३ अंशांच्या पुढे राहील. त्यामुळे उन्हाचा चटका आणखी तीव्र होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. वडगावशेरी, मगरपट्टा, प्रमुख भागांतील कमाल तापमान…वडगावशेरी – ४३.४, मगरपट्टा आणि ढमढेरे – ४३.३, कोरेगांव पार्क – ४३.१, शिरूर – ४३, चिंचवड – ४२.७, तळेगाव – ४२.४, हडपसर – ४२, खेड आणि इंदापूर – ४१.९, शिवाजीनगर आणि पाषाण ४१.८, पुरंदर – ४१.३, एनडीए – ४१.१, बारामती – ४०.८, दौंड ४०.४, हवेली – ३९.६, भोर – ३९.३, लवासा – ३८ अंश से.कोरेगाव पार्क आणि शिरूर भागात सर्वाधिक ४३ अंशांच्या पुढे कमाल तापमान गेले आहे. तर चिंचवड, हडपसर, शिवाजीनगर, पाषाण, एनडीए भागात कमाल तापमान ४२ अंशांपर्यंत गेल्यामुळे शहर अक्षरशः तापले असून, अंगाची लाहीलाही होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे