पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत तीन बॅलेट युनिट; शिरूर मधून ३२ उमेदवार रिंगणात
1 min read
पुणे दि.३०:- या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत बारामती- ३८, पुणे-३५, शिरुरमधून ३२ आणि मावळमधून ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता मतदानासाठी ईव्हीएमला तीन बॅलेट युनिट वापरावे लागणार आहे.जिल्ह्यात सुमारे ८ हजार २१३ मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रांवर एकूण २४ हजार ६३९ बॅलेट युनिट असणार आहेत. ईव्हीएमवरील बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांसाठीच बटणांची मर्यादा आहे.एक बटण हे ‘नोटा’ मतासाठी असते. त्यामुळे जर १५ उमेदवार रिंगणात असतील, तर एकच बॅलेट युनिट वापरावे लागते.
दरम्यान शिरुरमध्ये ३२ उमेदवार असल्याने दोन मशिनवर उमेदवारांचे नाव व चिन्ह तर तिसऱ्या मशिनवर फक्त नोटासाठी बटण असणार आहे. या ठिकाणी एक उमेदवार वाढल्याने तिसरे बॅलेट युनिट वापरावे लागणर आहे.
पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीसाठी उमेदवारांच्या संख्या जास्त असल्याने तीन बॅलेट युनिट मतदान यंत्राच्या टेबलवर असणार आहेत. त्यामुळे मतदानासाठी तीन बॅलेट युनिटवरील उमेदवारांची नावे व चिन्हे पाहून मतदारांना मतदान करावे लागणार आहे.