७० गावांतील आज दुपारी चार ते रात्री साडेअकरा या बत्ती गुल; वेळेत बदल 

1 min read

मंचर दि.२८:- बाभळेश्वर-आळेफाटा २२० केव्ही या अति उच्च दाब वाहिनीवर दुरुस्तीसाठी अत्यंत महत्वाचे काम रविवार (दि. २८) दुपारी चार ते रात्री साडेअकरा करावयाचे असल्याकारणाने आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील

सुमारे ७० गावांतील वीजपुरवठा काही काळ खंडित केला जाणार असून काम पूर्ण झाल्यावर तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे महापारेषणचे मंचर येथील कार्यकारी संजय वाघ यांनी सांगितले.

या आधी ही वेळ वेळेत (रविवार दिनांक २८.०४.२०२४ रोजी सकाळी १०:०० ते १६:३० पर्यंत देण्यात आली होती

त्याऐवजी दुपारी १६:०० ते रात्री २३:३० पर्यंत विद्युत पुरवठा बंद राहील असे दुसऱ्या निवेदनात म्हटले आहे याची नोंद घ्यावी.

रविवार (दि. २८) दुपारी चार ते रात्री साडेअकरापर्यंत २२० केव्ही आळेफाटा उपकेंद्र (३३केव्ही) कोलवाडी, बेल्हा, शिरोली, पिंपरीपेंढार, पिंपळवंडी, आळे, घारगाव, साकुर, पळसपूर २२० केव्ही काठापूर उपकेंद्र (३३केव्ही) रांजणी, निरगुडसर, पेठ,

काठापूर, मंगरूळ पारगाव, जांबुत, पाबळ १३२ केव्ही नारायणगाव उपकेंद्र (३३केव्ही) जुन्नर, ओतूर, खोडद, घोडेगाव, निरगुडसर, (११ केव्ही) मुक्ताई, मांजरवाडी, सावरगाव,

नारायणगाव एजी, कळंब, खोडद १३२केव्ही पिंपळगाव उपकेंद्र (३३केव्ही) अवसरी, पिंपळगाव १३२ केव्ही कवठे येमाई उपकेंद्र ३३केव्ही मलठण या या केंद्रा अंतर्गत सुमारे ७० गावांतील वीजपुरवठा बंद राहणार

असून ग्राहकांच्या गैरसोईबद्दल महावितरण आणि पारेषण विभागाने दिलगिरी व्यक्त करत ग्राहकांनी कृपया सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषणचे मंचर येथील कार्यकारी अभियंता संजय वाघ यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे