बेल्ह्यात सोमवारी भव्य हृदयरोग व मूत्ररोग शिबिर; आळेफाटा येथील श्री हॉस्पिटलचे आयोजन

1 min read

बेल्हे दि.१८ :- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे व श्री हॉस्पिटल आयोजित सोमवार दि.२० मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत भव्य हृदयरोग व मूत्ररोग शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरात मणक्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे मुतखड्याच्या शस्त्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथीच्या शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर, सांधे व हाडांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. तसेच ऍन्जिओग्राफी केल्यानंतर ब्लॉकेज अढळल्यास एन्जोओप्लास्टी महात्मा ज्योतिराव फुले व जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत केली जाईल.

हृदय तज्ञांकडून तपासणी कोणी करून का घ्यावी? छातीत दुखणे, जुने हृदय विकार, धाप लागणे / दम लागणे, सुज येणे, छाती धडधडने, रूटीन चेक-अप,थकवा येणे, चक्कर येणे अशा रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेऊन तपासणी करून घ्यावी.

या शिबिरात इ.सी.जी, हृदयरोग तज्ञांचा सल्ला,ब्लड शुगर, बीपी तपासणी मोफत केली जाणार आहे तसेच इतर लॅब तपासणीत ३० टक्के सूट मिळणार आहेत. स्थळ – प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे, ता.जुन्नर.अधिक माहिती साठी संपर्क- संतोष शिंदे ९०९६३९९३८४

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे