उपाशीपोटी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पाच पदार्थ!

1 min read

पुणे दि.७:- आपण तर उपाशीपोटी असाल तर काही गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे. खालील पाच गोष्टी उपाशीपोटी असताना खाणे किंवा पिणे टाळावे.१) मसालेदार पदार्थ:- अनेकांना चटपटीत, मसालेदार खाणे पसंत असते. मात्र, मसालेदार अन्न कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण मसालेदार अन्नामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते.

२)कॉफी:- सकाळी उठल्यावर अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते. अनेकांना सकाळ, संध्याकाळ आणि अगदी दुपारीही कॉफी लागते. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अपचन आणि पोटाचा त्रास होतो, असे म्हटले जाते. त्यामुळे पचनक्रियाही बिघडते. ३)चहा:- चहा ॲसिडिक असल्याने रिकाम्या पोटी चहा पिल्याने शरीराचा ॲसिडिक बॅलन्स बिघडतो. त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी साखरेचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि शरीरातील अनेक पेशींना आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ मधुमेहाचा धोका वाढतो. तेव्हा उपाशी पोटी चहा पिऊ नये.४) तळलेले पदार्थ:- सकाळी उठल्यावर तळलेले पदार्थ जास्त खाऊ नका. सकाळी उठल्याबरोबर तळलेले अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते आणि तुम्ही दिवसभर पोटाच्या समस्यांना बळी पडू शकता. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर तळलेले पदार्थ खाऊ नका.५) कोल्ड्रिंक:- सकाळची सुरुवात कधीही थंड पेय किंवा थंड पाण्याने करू नये. असे केल्यास पचनक्रिया बिघडू शकते. सकाळी उठल्यावर तोंड न धुता, रिकाम्या पोटी फ्रिजचे पाणी पिऊ नये. रिकाम्या पोटी फ्रिजमधील पाणी प्यायल्यास पचनक्रियेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तसेच पोटासंबंधीच्या इतर समस्यादेखील निर्माण होऊ शकतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे