गुळूंचवाडी येथे आरोग्य शिबिरात १५० जणांवर मोफत उपचार, समर्थ आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे आयोजन
1 min read
बेल्हे दि.२१:- गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथे मंगळवार दि.२४ रोजी मळगंगा देवीच्या सभागृहात समर्थ आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.
या आरोग्य शिबिरात पोटाचे आजार, हाडांचे आजार, हिमोग्लोबिन व शुगर तपासणी, स्त्रियांचे आजार, हृदयरोग, मधुमेह, सर्व प्रकारचे वात विकार, मूत्रविकार, त्वचारोग, मूळव्याध, भगंदर, फिशर, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार अशा विविध प्रकारच्या आजारांवरील तपासण्या व त्यावरील उपचार मोफत करण्यात आले.
या शिबिरात गुळूंचवाडी आणि पंचक्रोशीतील १५० नागरिकांना तज्ञ डॉक्टरांकडून आजारांवरील तपासण्या व उपचाराचा लाभ घेण्यात आला. ग्रामस्थांनी समर्थ कॉलेजचे विश्वस्त वल्लभ शेळके, डॉक्टरांची टीम तसेच संस्थेचे आभार मानले.