आरटीईसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

1 min read

पुणे दि.१७:- आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने बदल केला होता. त्या विरोधात पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने शासनाच्या सुधारीत आदेशाला स्थगिती दिली. न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवड्याभरानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त लागला आहे. आता आरटीई प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार आहे. पालकांना शुक्रवारी (दि. १७) पासून आरटीईसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरलेल्या पालकांनीही नव्याने आपल्या पाल्यांचा अर्ज भरावा लागणार आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत एक लाखांवर जागा उपलब्ध आहेत. आता आरटीई २४ टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांची यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे